Rain Orenge Alert गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. हवामान खात्याने आजही राज्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 3 ते 4 तासांमध्ये कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस असणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ Rain Orenge Alert
पुढील काही तासांमध्ये मराठवाडा, कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे:
पंजाब डख यांचा हवामान अंदाज, पुढील 72 तास राज्यात जोरदार पावसाची शक्यता!
- मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली.
- कोकण आणि घाटमाथा: संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील प्रदेश.
या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’
काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे:
- मराठवाडा: बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड.
- विदर्भ: अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर.
- उत्तर महाराष्ट्र: जळगाव, नाशिक, धुळे आणि नंदुरबार.
शेतकरी आणि नागरिकांनी पावसाच्या या अंदाजाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि योग्य ती काळजी घ्यावी. सुरक्षित राहा!
शिधापत्रिका धारकांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ₹2,000 थेट बँक खात्यात